महाराष्ट्र: सहकारिता मंत्री सुभाष देशमुख यांच्या गाडीतून किमान 92 लाख जप्त

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (11:08 IST)
भाजप नेता आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सहकारिता मंत्री सुभाष देशमुख यांच्या गाडीतून किमान 92 (91.5) लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. वृत्तानुसार पकडण्यात आलेली गाडी सुभाष द्वारा संचलित लोकमंगल ग्रुपची आहे. गाडीतून जप्त कॅश बॅन करण्यात आलेल्या नोटा  500 आणि 1000च्या आहे. सुभाष यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की हा ऊस टोलीचा पैसा आहे. तिकडे निवडणुक आयोगाने हे पैसे जप्त केल्यानंतर लोकमंगल समूहाला नोटिस पाठवून 24 तासात उत्तर मागितले आहे.  
 
ओस्मानाबादचे कलेक्टर प्रशांत नरनावारे यांनी याची पुष्टी केली आहे की पोलिसच्या एका रूटीन तपासणी दरम्यान बुधवारी रात्री हा पैसा जप्त करण्यात आला आहे. प्रशांतानुसार निगम निवडणुका येत असल्यामुळे सर्व गाड्यांची तपासणी करत होती. गाडीमधून पकडण्यात आलेल्या लोकांनी पोलिसांसमोर स्वीकारले केले आहे की हा पैसा लोकमंगल बँकेचा आहे. पोलिसांप्रमाणे सध्या आम्ही या कॅशला सीज केले आहे पण या कॅशवर आपला योग्य हक्क दाखवला तर हा पैसा परत करण्यात येईल.  

वेबदुनिया वर वाचा