रोहित पवारांनी आधी आजोबांचा आणि दाऊदचा संबध पाहावा - पडळकर

शनिवार, 5 मार्च 2022 (08:45 IST)
एन. के सूद नावाचे निवृत्त रॉ ऑफिसर आहेत. रोहित पवारांनी त्यांची मुलाखत बघावी. त्या मुलाखतीत तुमचे आजोबा आणि दाऊदविषयी त्यांनी काय खुलासे केलेत, याकडे आधी लक्ष घाला आणि मग महाराष्ट्राला शहाणपणा शिकवण्याचं काम करा, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.  
 
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पडळकर पत्रकारांशी बोलत होते.
 
"रोहित पवार यांच्यासाठी हा राजकारणाचा विषय असेल. पण भाजपसाठी नाही. नवाब मलिकांच्या पाठीमागे का उभं राहता, याचं उत्तर पवार कुटुंबीयातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीनं लोकांना द्यावं," असंही पडळकर पुढे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती