Relationship Tips :एकुलत्या एक मुलाचे संगोपन करताना पालकांनी केलेल्या या चार चुका त्याचे भविष्य खराब करू शकतात

मंगळवार, 1 मार्च 2022 (22:04 IST)
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगले आणि निरोगी संगोपन आवश्यक आहे. अनेकदा दोन किंवा तीन मुले एकत्र असतात, त्यामुळे ते एकत्र काम करायला, गोष्टी शेअर करायला आणि एकमेकांशी तडजोड करायला शिकतात. पण एकटे मूल घरी असताना पालकांची जबाबदारी वाढते.एकुलता एक एक असताना मुलांना कधीकधी एकटेपणा जाणवतो. त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज असते. जास्त लक्ष दिल्याने त्यांच्या वागणुकीवरही वाईट परिणाम होतो. एकुलता एक मुलगा असल्याने पालकांचे अवाजवी लाड त्याला  बिघडवू शकतात, तर एकुलत्या एक मुलाकडून पालकांच्या मोठ्या अपेक्षा त्याच्यावर दबाव आणू शकतात. एकुलत्या एक मुलाचे संगोपन करताना पालक अनेक चुका करतात, ज्यामुळे मुलाचे वर्तन आणि भविष्य खराब होऊ शकते. मुलांचे संगोपन करताना या चुका करू नका. 
 
1 त्यांच्यावर  इच्छा लादणे-अनेकदा पालक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलावर दबाव आणतात. ते मुलावर खूप अपेक्षा लादतात आणि मुलाने त्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करतात. त्यामुळे मूल तणावाखाली येऊ शकतो. पालकांच्या इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुलावर मानसिक आणि शारीरिक दबाव वाढतो.
 
2 जास्त संरक्षण करू नका-जेव्हा कुटुंबात एकच मूल असते तेव्हा पालक त्याला अधिक संरक्षण देतात. ते मुलांच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करतात आणि मुलांचा बचाव करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. मुलाला त्याच्या मनाप्रमाणे मोकळेपणाने काम करता येत नाही आणि त्याला स्वतःला बंदिस्त वाटतं.
 
3 मुलाला बाहेर जाण्यापासून रोखणे-समाजात राहण्यासाठी मुलाला बाहेरील वातावरणात मिसळता आले पाहिजे. मूल बिघडू नये किंवा अडचणीत येऊ नये म्हणून पालक त्यांना बाहेर जाण्यास मनाई करतात. अशा स्थितीत मुलाला स्वत:ला कैदेत  केल्या सारखे आणि एकटेपणा जाणवतो. कदाचित पालकांच्या या वागणुकीमुळे तो त्यांच्यापासून दुरावू लागतो.
 
4 निर्णय घेण्याचा अधिकार न देणे-पालक अनेकदा आपल्या मुलांना अज्ञानी आणि जबाबदार न मानून त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक निर्णय घेतात. मग ते त्यांच्या आवडीचे खेळणी घेणे असो किंवा त्यांच्या शिक्षणाशी संबंधित निर्णय असो. मुलांना स्वतःसाठी काही निर्णय घेऊ द्या. जर त्याने चुकीचा निर्णय घेतला तर त्याला भविष्यासाठी धडा मिळेल. त्याला स्वतःच्या  चुकांमधून शिकण्याची संधी द्या. जर आपणच त्याचे निर्णय घेतले तर तो आयुष्यात नेहमी त्याच्या निर्णयांबद्दल गोंधळलेला असेल. त्याची l निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होईल.
 

वेबदुनिया वर वाचा