सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर रोहित पवार यांची नियुक्ती

बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (08:52 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेकदा विद्यार्थ्यांच्या प्रशांवर आवाज उठवला आहे. ते शासनासमोर मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांची राज्य विधान मंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधी मंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले. नुकतेच त्यांची ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी देखील निवड झाली होती. त्यानंतर आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर दुसरी मोठी जबाबदारी पडली आहे.
याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, "माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचा, विधानमंडळाचा आणि अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा आभारी आहे. माझ्यावरील विश्वासाला पात्र ठरत विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन." असे म्हणत आभार व्यक्त केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती