१९ बंगल्याबाबत सरपंच यांनी केला असा खुलासा

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:50 IST)
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रायगडमधल्या १९ बंगल्यांवरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. या मुद्द्यावर खुद्द कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला आहे. सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जमिनीवर प्रत्यक्षात १८च घरं होती. “२००९ला अन्वय नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही घरं घेतली होती. त्यांना रिसॉर्ट तयार करायचं होतं. त्यानंतर सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी तो प्लॅन रद्द केला. त्यानंतर त्यांनी त्या जागेची लेव्हलिंग करून तिथे झाडं लावली”, अशी माहिती मिसाळ यांनी दिली आहे.
 
दरम्यान, अन्वय नाईक यांनी ही घरं पाडल्यानंतर देखील २०१४पर्यंत तिथल्या १८ घरांची घरपट्टी चालू स्थितीतच राहिली. २०१४पर्यंत अन्वय नाईक यांनी घरपट्टी भरली आहे. २०१४ला मनीषा वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी ती जागा विकत घेतली. मात्र, २०१९ला अर्ज करून त्यांनी संबंधित जागेची मालकी त्या दोघींच्या नावावर केली. आजच्या स्थितीत २०२१मध्ये तिथे एकही घर नसल्यामुळे आम्ही ती घरं कागदोपत्री रद्द केली आहेत”, असं मिसाळ म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती