परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू :महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस

मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (21:04 IST)
पुणे वायव्य राजस्थानातून सोमवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. एक आठवडा उशिरा मान्सून माघारी फिरला आहे.
 
17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून माघारी फिरतो. यंदा त्याचा प्रवास उशिरा सुरु झाला आहे. राजस्थानच्या वायव्य भागात ऍन्टी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या भागात गेले पाच दिवस हवामान कोरडे असून, पाऊस झालेला नाही. ही सर्व स्थिती परतीच्या मान्सूनची आहे, असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
 
परतीचा मान्सूनही बरसणार
दरम्यान, परतीचा मान्सूनही जाताना भरभरुन बरसत असतो. महाराष्ट्रातील काही जिल्हे तर यावरच अवलंबून असतात. यंदाही पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे.
 
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस
 
सध्या दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर व दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवमाडा व विदर्भात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती