मीडियाशी बोलू नका उद्धव यांची गायकवाडांना सूचना

सोमवार, 27 मार्च 2017 (11:39 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड यांना केवळ समज दिली आहे. मीडियाशी बोलू नये, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी रवींद्र गायकवाड यांना दिली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारल्यानंतरही शिवसेना रवींद्र गायकवाड यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं चित्र आहे.उद्धव ठाकरेंनी गायकवाड यांना केवळ समज देऊन सोडलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी वर्तन चांगलं असावं अशी सूचना केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा