दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश जारी केले आहेत. विधानसभेच्या निवडणुका आता पूर्ण झाल्या असून आचारसंहिता संपुष्टात आल्याने, राज्य सरकारच्या आदेशानुसार रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या डीजीपी म्हणून पदभार स्वीकारू शकतात. रश्मी शुक्ला लवकरच संजय वर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींच्या बदलीचे आदेश दिले होते. यानंतर रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून हटवण्यात आले, त्यांच्या जागी संजय वर्मा यांना महाराष्ट्राचे डीजीपी पद देण्यात आले. निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता संपल्याची घोषणा केली.
त्यानंतर तात्काळ राज्य सरकारने पुन्हा शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची धुरा सोपवली आहे.खरेतर, विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांच्या जागी या कॅडरच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. यानंतर संजय वर्मा यांच्याकडे डीजीपी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता आदेश जारी झाल्यानंतर रश्मी शुक्ला पुन्हा डीजीपी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता संपल्याची घोषणा केली. त्यानंतर तात्काळ राज्य सरकारने पुन्हा शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची धुरा सोपवली आहे.29 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील राजकीय प्रेरित गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि डीजीपी रश्मी शुक्ला यांना अशा घटनांविरूद्ध कठोर कारवाई सुनिश्चित करण्यास सांगितले होते.
1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची 4 जानेवारी 2024 रोजी राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती केली. तत्पूर्वी त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेस नेते नानापटोले यांनी रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. निवडणूक संपतातच राज्य सरकार ने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस प्रमुख पदावर नियुक्ती केली.