रामनवमीचा उत्साह, शिर्डीत गर्दी

शनिवार, 13 एप्रिल 2019 (10:05 IST)
देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. रामनवमी निमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणुका आणि कीर्तन, आणि प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळणार आहे.
 
देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईंची नगरी शिर्डी सध्या राम नामाच्या जयघोषात दुमदुमलीय. शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतोय. साई मंदिरात सकाळी काकड आरती करण्यात आली. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी रामनाम आणि साईनामाच्या गजरात शिर्डी दुमदुमून गेली. तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत. राज्याच्या विविध भागातून आणि शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातूनही भाविक शिर्डीत पोहचलेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालख्याही शिर्डीत दाखल झाल्यात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती