राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला खासदार निधीतून विभागून मदत घोषित केली आहे. हैद्राबादमार्गे कोल्हापूरात येत पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या.
त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची, मदतीची गरज आहे असे माध्यमांना सांगितले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्याला 25 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला 25 लाख असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतून देणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यातील अन्य आमदार, खासदारांनीही त्यांनी मदत देण्याचे आवाहन केले.