शेतकऱ्याचे देशव्यापी आंदोलन, 6 जुलै ते 2 ऑक्टोबर पदयात्रा

शनिवार, 17 जून 2017 (12:07 IST)

राज्यापाठोपाठ देशातही संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन मागण्यांसाठी आता देशव्यापी आंदोलन उभं केले जाणार आहे. 6 जुलै ते 2 ऑक्टोबर या काळात देशव्यापी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शेतकरी नेत्यांनी केली. शेतकऱ्यांवरच्या गोळीबारामुळे चर्चेत आलेल्या मध्यप्रदेशातल्या मंदसौर इथून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी बिहारच्या चंपानेर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यापासून केंद्र सरकार हात झटकू शकत नाही. विषय राज्यांचा असला तरी सगळी धोरणं ही केंद्र सरकारच्याच हातात असल्यानं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबण्यात केंद्र सरकारच कारणीभूत आहे असा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा