युतीचा प्रश्न संपला - राज ठाकरे

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (09:30 IST)
मराठी माणसासाठी हितासाठी  कुणाचेही पाय चाटेल, मात्र  पण मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पाय छाटेन अशी घणाघाती टीका करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर अनेक दिवसापासून मनसे शिवसेना  युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला असं जाहीर करुन टाकल आहे. तसंच भाजप नको होती म्हणून हात पुढे केला होता असा खुलासाही राज ठाकरे यांनी केला आहे. दादर येथे कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
 
दिल्लीमध्ये मराठी तरुणांना मारहाण होते आणि आपल्याकडे नेते काहीच करत नाही. त्या जागी जर बिहार, उत्तरप्रदेश असता तर तिकडच्या नेत्यांनी रणकंदन घडवलं असतं. आपले ते  सुरेश प्रभू रेल्वे मंत्री यांना पाहिलं की हातात तंबाखू देऊ वाटते, सारखं हात चोळत असतात अशी खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली आहे.
 
राज ठाकरेंने काय केले, असा प्रश्न मला प्रश्न विचारला जातो. माझ्या हातात सत्ता द्या, मग बघा काय करुन दाखवतो ते. नाशिकमध्ये 1 पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही. नाशिकचा विकास 5 वर्षांत केला. गेल्या 25 वर्षांत असा विकास कोणी करुन दाखवला आहे का, ते पाहा, असा टोला विरोधकांना लावला आहे.

वेबदुनिया वर वाचा