राज यांचा परप्रांतीय दावा पुराव्यासह ठरला खरा

गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (16:41 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीय कसे आपल्या राज्यात येत असून त्यामुळे आपल्या शहरांचे कसे हाल होत आहे. हे नेहमीच सांगत आहेत. आता मात्र हे खरे ठरेल आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबत मोठा सर्वे केला आहे.त्यांनी पुरावे देत जगातील अश्या राज्य आणि शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये आपल्या राज्यातील सर्वाधिक बिहारी जनता ही मुंबई आणि पुणे येथे येत आहे. यामध्ये 1991-2001 च्या तुलनेत 2001-11 दरम्यान भारतातील स्थलांतराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. भारतातून इतर राज्यात घुसखोरी करणारे राज्य आहे बिहार.गरिबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात स्थलांतर करत आहे.बिहारमधील लोंढे मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यात जात असून व्यवस्थेवर ताण निर्माण करत आहे.बिहारचं दरडोई उत्पन्न हे सोमालियासारख्या गरीब देशाएवढं म्हणजेच वार्षिक 33 हजार रुपये आहे.
 
यामध्ये सर्वात चांगले आणि कोठेही स्थलांतर न करणारे राज्य आहे केरळ. केरळचं दरडोई उत्पन्न हे बिहारच्या चौपट म्हणजेच सुमारे 1 लाख 52 हजार आहे.त्यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्याला आता पुरावा मिळाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती