दिल्लीत संताप मोर्चा होतोय , राज ठाकरे लवकरच येणार

गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:03 IST)

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आज  ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं असून , या मोर्चात एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेने   आक्रमक पवित्रा घेवून आपला संताप व्यक्त केला होता. तर यामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी  मुंबईत संताप मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे पूर्ण मुंबई आणि राज्य राज ठाकरे यांच्या कडे पाहत आहे.हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्टेशनपर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चा सकाळी साडेअकरा वाजता सुरु होणार होता यामध्ये अनेक अंग्रिक जमत असून, या मार्गावर गर्दी करत आहे. फेरीवाले पळून गेले असून त्यामुळे अनागरिक क्षनीक खुश झाले आहेत.राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले आहेत. सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकांरांचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केल आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती