भारत व कॅनडा यांच्या मैत्रीला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या दोन देशांच्या कराराअंतर्गत तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याची प्राथमिक पाहणी करण्यासाठी कॅनडा प्रशासनाचे रेव्हीज व त्यांच्या सहकारी शूवॉटर तारा अँजला हे पंढरीच्या दौर्यावार आले होते. या पथकाने प्रथम श्री विठ्ठल-रूक्मिणीजे दर्शन घेऊन मंदिरापासून चालत महाद्वारा घाटापर्यत पाहणी केली. नंतर संत तुकराम भवन येथे विविध महाराज मंडळी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.