परळी जाताना राज ठाकरेंची हुरडा पार्टी

बुधवार, 18 जानेवारी 2023 (11:03 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे हे आज हेलिकॉप्टरने बीड जिल्ह्यातील परळी येथे परळी न्यायालयात हजर होण्यासाठी निघाले असता औरंगाबादच्या पळशी मधील एका रिसॉर्टला थांबले. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यासाठी त्यांनी विसावा घेतला. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांसह हुरडा खाण्याचा आस्वाद घेतला.

राज ठाकरे यांना चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी परळी न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावले आहे. त्यासाठी ते आज परळी न्यायालयात हजर होणार आहे.हुरडाचा आस्वाद घेऊन ते परळी कडे निघाले. चिथावणीखोर वक्तव्य आणि कार्यकर्त्यांनी एसटी बसवर केलेल्या दगडफेक प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना परळी न्यायालयांनी अजामीनपात्र वॉरंट दिले आहे. त्यासाठी राज कोर्टात हजर राहण्यासाठी निघाले.
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती