मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. अलिबाग, माणगाव आणि रोहा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पेण परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे.