ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गात पावसाची हजेरी

मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (09:38 IST)
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु असता सर्वत्र थंडीचा कडाका वाढत असताना राज्यात सोमवारी काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसानी आपली हजेरी लावली. राज्यात कणकवली जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अवकाळी पावसामुळे काजूच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आंबा ,काजूचे पीक खराब होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायबच आहे.नागरिकांना उकाडा जाणवत असताना आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. रस्त्यावर पाणी चाले होते. नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी  दुकान, घराचा आडोसा घेत होते. राज्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काजू आणि आंब्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बागायतदार चिंतेत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती