गाजर मेथीची भाजी बल्ड शुगर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (16:03 IST)
गाजर मेथी या खास डिशमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या दोन भाज्या आहेत. मेथीची पाने अतिशय आरोग्यदायी असतात. गाजर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते. मेथीची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी असतात. वजन कमी करण्यास मदत करते आणि त्वचेसाठी उत्तम आहे. ही डिश किती पौष्टिक आणि स्वादिष्ट असू शकते याची तुम्ही कल्पना करून बघा आणि तयार करा ही सोपी डिश- 
 
गजर मेथी बनवण्यासाठी साहित्य
1 किलो गाजर
300 ग्रॅम मेथीची पाने
2 टीस्पून धने पावडर
चवीनुसार मीठ
1 टीस्पून मेथी दाणे
½ टीस्पून लाल तिखट
4 लाल मिरच्या
½ कप तेल
 
गजर मेथी बनवण्याची सोपी पद्धत
गाजर सोलून घ्या. नंतर लहान चौकोनी तुकडे करा.
आता मेथीची पाने स्वच्छ धुवून घ्या.
मेथीची पाने बारीक चिरून घ्या.
कढई गरम करून तेल घाला. आता मेथी दाणे आणि लाल मिरची घाला.
नीट परतून घ्या.
यानंतर त्यात गाजर आणि चिरलेली मेथीची पाने टाका.
काही मिनिटे एकत्र परतून घ्या.
लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घाला.
चांगले मिक्स करून झाकण ठेवा.
गाजर मऊ होऊन मेथीची पाने शिजलेली दिसू लागल्यावर गॅस बंद करा.
पोळी भाकर किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती