तसेच मंगळवार ते गुरुवार राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस सुरू होत आहे. यावर्षी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात जूनमध्ये उशिरा मान्सून दाखल झाला.परंतु जुलैची सुरुवात चांगली झाली आणि २९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २ दिवस विदर्भात गडगडाटी वादळे येऊ शकतात. हवामान खात्याने मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ, रायगड आणि पुणे जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.