मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.
परतीचा पाऊस लांबण्याची अनेक कारणे आहेत. समुद्राचे वाढलेले तापमान, कमी दाबाचा पट्टा तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळे तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. याचा थेट परिणाम हा पावसावर झाल्याचे दिसून येत आहे.