नाशिक : जवानाची आत्महत्या, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर झाडली गोळी

शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:22 IST)
नाशिकमधील भारतीय वायुसेनेच्या जवानाने रात्रपाळी कर्तव्यावर असताना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने  स्वतःवर गोळी झाडली. वीरेंद्र कुमार (२७,नेमुणूक एअरफोर्स स्टेशन, देवळाली) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे.
नाशिकमधील देवळाली कॅम्प छावणी चा परिसर हा लष्करी अस्थापनांचा परिसर आहे. या भागात कार्यरत असलेल्या दक्षिण वायुसेना स्टेशन मध्ये वीरेंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. रात्रपाळीच्या सुरक्षा कर्तव्यावर तैनात असताना त्यांनी अचानकपणे पिस्टल मधुन अंगावर गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी नोंद करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात आहे. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती