Rain in Maharashtra: राज्यात मुंबई,पुण्यात पावसाचा जोर वाढणार, विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (12:12 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून राज्यातील पूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विदर्भातही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. गडचिरोली, भामरागड आदी भाग पाण्याने बुडाले आहेत. या पूरग्रस्त ठिकाणी एनडीआरएफ मदत करत आहे.काही ठिकाणी पावसामुळे शेती पिकांनाही फटका बसला आहे. अनेक क्षेत्रात  हवामान खात्याने उद्या अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या हवामान खात्यानं आज मुसळधारपावसाची शक्यता वर्तवली आहे.आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची चिन्हे दर्शवली आहेत. 
 
हवामान खात्यानं मुंबई, ठाणे आणि लगतच्या इतर उपनगरी शहरांमध्ये  हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय कोकण आणि कोकण किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना  सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती