राज्यात पाऊस, अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु

गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (15:56 IST)
राज्यातील अनेक भागांत दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. मुंबईसहमराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी कोसळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली होती. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे आगमन झाले आहे. श्रावण महिन्यातील या पावसामुळे शेतकऱ्यांनाही आनंद झाला आहे. दुबार पेरणीनंतरच्या या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना अधिकच फायदा होईल. तर, पर्यटकांनाही निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हा पाऊस आनंद देऊन जात आहे. निसर्गरम्य ठिकाणीचे धबधब्यांनाही या पावसामुळे पाणी आले आहे. तर, श्रावणाचे आगमन होताच, सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे.
 
दुसरीकडे मध्य प्रदेश आणि केरळमध्ये मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती