रायगडमध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद

गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये मंगळवारी भीराचा दुसरा क्रमांक होता. न्यूझीलंडजवळील सामोआ येथे जगातील सर्वाधिक 49.6 अंश सेल्सिअस तापमान होतं. अकोल्याचा या यादीत 11 वा क्रमांक होता. अकोल्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं.

वेबदुनिया वर वाचा