महाडला सावित्री नदीवरील नवीन पुलाचे गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार

सोमवार, 5 जून 2017 (11:27 IST)

महाराष्ट्रातील रायगड येथील असलेल्या  महाडमधील सावित्री नदीवरील नव्या पुलाचं आज (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तर याच ठिकाणी जेव्हा जुना पूल होता तेव्हा मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी बुडाली. तर सर्वच्या सर्व 40 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मोठा जनक्षोभ झाला होता. तर राज्यातील अनेक पूल आहेत त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे सरकारने तदाडीने निर्णय घेत नवीन पुल बांधत राज्यातील जुने पुलाच्या ऑडिट करयला सांगितले होते.या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी 6 महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती.त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा