मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली निवडणुकीसाठी मतदान करण्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या आमदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने आमदार दिनेश मोहनिया यांच्यावर प्रचारादरम्यान विनयभंगाचा आरोप केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, आप आमदार फ्लाइंग किस करत होते. घटनेच्या व्हिडिओच्या आधारे, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणावर आमदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.