दीपोत्सवाच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचं गाणं थांबवलं

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (14:29 IST)
दीपोत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दीपोत्सवानिमित्त भाजपने मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानावर  दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गायक राहुल देशपांडे यांचा गाण्याच्या कार्यक्रम सुरु असताना अभिनेता टायगर श्राफची एंट्री झाली. त्यांची एंट्री झाल्यावर राहुल देशपांडे यांना गाणं थांबवायला सांगितलं. आपण पाच मिनिट गाणं थांबवा आम्हाला टायगर श्राफ यांचे सत्कार करायचं  आहे. 
या वर राहुल याणी म्हटलं की मी जर गं थांबवलं तर पुन्हा गाणं म्हणणार नाही. मला 20 मिनटे गाऊ द्या नंतर तुम्ही त्यांचा सत्कार करा. मी ब्रेक घेतला तर पुढे गाणार नाही. मला हे सांगण्यात आलं नव्हतं . ब्रेक घ्यायचा असल्यास मी उठतो. त्यावर मिहीर कोटेचा तेथे येऊन म्हणाले हे फक्त सत्कार आहे. नंतर राहुल यावर काही बोलत नाही. आणि टायगर श्राफ यांचा सत्कार एका कोपऱ्यात केला गेला. या नंतर राहुल देशपांडे यांचं गाणं सुरु झालं. या वरून सचिन अहिर आक्रमक होऊन त्यांनी भाजपवर टोला लगावून ट्विट केले आहे. त्यांनी भाजपच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात मराठी कलाकाराचा अपमान झाल्याचे म्हटलं आहे.  
 हाच का मराठी कलाकारांचा सन्मान !!! भाजप आयोजित मराठी सन्मानाचा मराठमोळा दीपोत्सव.
मराठी कलाकारांचा अपमान करून मराठी कलाकारांची चेष्ठा असे ट्विट मध्ये म्हटले आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती