नगर मध्ये 370 किलो चंदनासह 'पुष्पा' ला अटक

शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:12 IST)
नगरच्या कुख्यात चंदन तस्करला पोलिसांनी 370 किलो चंदनासह अटक केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नगरच्या चिंचोडी पाटील येथील कुख्यात चंदन तस्कर ला अटक केली असून त्यांच्या जवळून  370 किलो चंदन आणि इनोव्हा कार जप्त केली आहे. त्यांच्याकडून असा 18 लाख 96 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सुभाष भीमराज दिलवाले(47) असे या चंदन तस्कर 'पुष्पा'चे नाव आहे. सदर आरोपीच्या नावावर चंदन तस्करी सह खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे.
 
पोलिसांनी आरोपी सुभाष आणि त्याचा साथीदाराला राजेंद्र रंगनाथ सासवडे(30) याना कोतवाली पोलिसांनी चंदन तस्करी करून माल घेऊन  नगर येथून जात असताना चांदणी चौकात सैनिक लॉन्स जवळ पकडले. त्यांच्या कडून इनोव्हा कार आणि चंदनाची 370 किलो लाकडे जप्त केली आहे. त्यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती