ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे या दोघांना डेक्कन पोलिसांनी समज दिली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही, असे स्पष्ट करत कार्यक्रम घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डेक्कन पोलिसांनी दिला आहे.