हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. काही महिन्यांपूर्वीच नवनाथ कांबळे यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्विकारला होता. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मित्रपक्ष आरपीआयला (आठवले गट) उपमहापौर दिलं. आरपीआयकडून उपमहापौर म्हणून नवनाथ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कांबळे कोरेगाव मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते.