मिळालेल्या माहितीनुसार, एनआयबी रोड जवळ इशरत बाग जवळ उंड्रीच्या दिशेने चालत्या बसचे चढणावर रात्री आठ वाजेच्या सुमारास बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे आणि बस रिव्हर्स आल्यामुळे बसने 5 ते 6 वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु केली.