शासकीय जाहिरातींमध्ये मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करा

गुरूवार, 23 जानेवारी 2020 (16:24 IST)
राज्य सरकारतर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख केला आहे.
 
शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित केले जात नाही. वारंवार प्रकाशित झालेल्या जाहिरातींमधून ही गोष्ट निदर्शनास आली आहे. सुप्रीम कोर्टाने 13 मे 2015 आणि 18 मार्च 2016 रोजी याबाबत सविस्तर दिशानिर्देश आपल्या निकालपत्रात दिले आहेत, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती