आता मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील अनेक भागात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे आणि नरेंद्र महाराजांचे अनुयायी आणि भक्त रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे आणि त्यांना माफी मागण्याचा इशारा देण्यात आला आहे, अन्यथा निषेध तीव्र केला जाईल. त्यामुळे नरेंद्रचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.