शिवसेना नेते यशवंत जाधव यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (09:37 IST)
शिवसेनेचे नेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी भायखळ्यातील 31 आणि वांद्रे येथील 5 कोटींचे फ्लॅट आयकर विभागाने जप्त केले आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून यशवंत जाधव हे आयकर विभागाच्या रडारवर असून काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरावर आणि मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते. छाप्यात मिळालेल्या माहितीनंतर जप्तीची कारवाई करण्यात आली  असून आयकर विभागाने भायखळ्यातील बिलखडी चेंबर्स इमारतीतील 31 फ्लॅट आणि वांद्रे येथील 5 कोटी रुपयांच्या फ्लॅटचा समावेश आहे. आयकर विभागाने जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतणे विनीत जाधव यांनाही समन्स बजावले आहे. 
 
2018 ते 2022 या कालावधीत स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जाधव यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याचा आयकर विभागाला संशय आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती