पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्याच्या सभेत मराठी भाषेत बोलले!

शनिवार, 20 एप्रिल 2024 (16:59 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात सभा पार पडली महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली. त्यांनी भविष्यात पूर्ण करण्याच्या योजना सांगितल्या. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीत केली. ते म्हणाले, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि या सभेत उपस्थित असलेले माझे बंधू भगिंनीनो जय गुरु. ही भूमी संतांची पुण्य भूमी आहे.

मला इथे येण्याचा आणि त्यांना स्मरण करण्याचा योग्य मिळाला. मी खूप भाग्यशाली आहे. आज चैत्र एकादशी यात्राचा दिवस आहे. पंढरपुरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार महत्त्वाच्या यात्रा आहे. रूप पाहता लोचनी,सुख झाले तो साजणी,तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पुण्यकाळात मी भगवान श्रीहरी विठ्ठलाच्या चरणी शतश: नमन करतो.लोकसभा निवडणूक 2024 ही विकसित भारत आणि आत्मनिर्भरतेसाठी आहे. 

गावातील लोकांना काही वर्षांपूर्वी वाटत होते की त्यांना गरिबीतून मुक्तता मिळणार नाही पण आज गावातील गरिबाला गरिबीतून मुक्तता मिळाली आहे. शेतकऱ्यांच्याही समस्या होत्या, गावातील महिलांच्या देखील समस्या होत्या. आता त्या दूर झाल्या आहे. ज्यांना कोणीच विचारले नाही त्यांना या गरीबाच्या मुलाने विचारले आहे. त्यांना पुजले आहे. पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षाच्या कामाची माहिती देखील जनतेला सांगितली.

ज्यांना कोणाला आमच्या योजनांचा लाभ मिळाला नसेल ज्यांना घर, गॅस, पाणी आणि शौचालयचा लाभ मिळाला नाही त्यांनी अशा लोकांची नोंद करून आम्हाला पाठवा.त्यांना सांगा मी मोदींकडून आलो आहे. आज देश मोदींची गॅरंटी बघत आहे. गॅरंटी देण्यासाठी आत्मविश्वास आणि हिम्मत लागते. त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणले काँग्रेसचा कारभार आणि त्यांचे नेत्यांचे विचार विकास आणि शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे.

त्यांच्या काळात शेतकऱ्याचे हाल होत होते. त्याच्या काळातील कामे म्हणजे बारशाला गेला आणि बाराव्याला आला असे होते. या वेळी पंतप्रधानांनी पक्षाच्या संकल्प पत्रातील आश्वासनांचा उल्लेख केला. आणि वर्ध्यातून भाजपचे उमेदवार रामदास तडस आणि अमरावतीहून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने विजयी  करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती