दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या सहकार परिषदेस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, तसेच खासदार,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शाह प्रथमच नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे येत असल्याने या दौर्याचे महत्त्व राज्याच्यादृष्टीने विशेष मानले जाते.केंद्र सरकारने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका यांच्या बाबतीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंलबजावणी सुरू झाली आहे.
पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले जिल्याचे भुमीपुत्र पद्मश्री पोपटराव पवार आणि श्रीमती राहीबाई पोपेरे यांचा गौरव तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. रमेश धोंडगे, डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.