देशात दररोज हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच दावा केला आहे. आंबेडकर यांच्याप्रमाणे करोनामुळे मृत्यू होत नसून सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
त्यांनी म्हटले की जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहेच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. परंतू सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.