औरंगाबाद येथे येत्या १० आणि १७ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

मंगळवार, 24 मे 2022 (15:43 IST)
औरंगाबाद क्षेत्रासंबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 10 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ए.के.धनवडे, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि ), पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद 431002 यांचेकडे 2 जून 2022 पर्यंत दोन प्रती सह अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. तक्रार अर्जाचा नमुना www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र यांनी कळविले आहे.
 
 महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता मुंबई येथे आयोजित केलेल्या 119 व्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेंबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि ) तथा सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, जीपीओ इमारत, दुसरा माळा, मुंबई यांचेकडे 31 मे 2022 पर्यंत दोन प्रती सह अथवा तत्पुवी पोहोचे अशा बेताने पाठवावी. असे मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी कळविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती