छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात येत आहे. महत्वाची या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग' असे आहे.
महाराजांची 50 वर्षांची कारकिर्द विविध घटनांनी भरलेली आहे. याचा आढावा अनेक पुस्तकांतून मांडला आहे. यामध्ये महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे दिले जाणार आहे. या सगळ्याचे बारकावे अभ्यासक्रमात आहेत. हा अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे.