सावधान, मुंबईच्या प्रदुषणाने गाठला उच्चांक

मुंबईच्या  हवेने सोमवारी प्रदुषणाचा सर्वाधिक उच्चांक गाठला. ‘सफर’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल या भागामध्ये सर्वाधिक असे वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप यांचा नंबर लागतो.  
 
सफर या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जात आहे. सफरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सर्वाधिक असे ३४१ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. 
 
त्याखालोखाल अंधेरी येथे ३३९ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. मालाड येथे ३११, बोरीवलीमध्ये २८७, कुलाबा १४५, वरळी १३९ पर्टिक्युलेट मॅटर इतके धूलिकणांची नोंद झाली आहे. मध्य उपनगरातील भांडूपच्या हवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुलिकण मिसळले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती