माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. या सगळ्यावर भा.द.वि. कलम 409, 420, 464, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.