मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान सर्वांसाठी आर्थिक आणि सुलभ आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या आपल्या प्रतिबद्धता अनुरूप महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली, अंबरनाथ मध्ये असलेल्या दहा सरकारी मेडिकल कॉलेजच्या संचालनाचे शुभारंभ करतील.
तसेच ही महाविद्यालये, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर जागांच्या वाढीसह, लोकांना विशेष तृतीय श्रेणी आरोग्य सेवा देखील प्रदान करतील.