आता बस प्लास्टिक पिशवी आढळली की दुकानाचा परवाना रद्द

बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:57 IST)
तीन महिन्यांची मुदत प्लास्टिकचा असलेला साठा संपविण्यासाठी देण्यात आली होती. ही मुदतही आता संपलेली आहे.राज्यसरकारने त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी कठोर पावले उचलली आहेत. आता एखादी जरी प्लास्टिकची पिशवी दुकानात आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द होईल. शिवाय दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. 
 
युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्लास्टिक बंदी संदर्भात महत्त्वाची बैठक झाली आहे. प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरण खात्याला कठोर पावलेउचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण खात्याने कठोर पावले उचलली असून, प्लास्टिक वापरणार नसल्याचं दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतलं जाणार असे नमूद केले आहे. मात्र दुकानदार किंवा अन्य यांना संधी देऊनच ही कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आली तर त्वरित दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश रामदास कदम यांनी आज दिले आहेत. गणपती उत्सवाच्या काळात थर्माकोलवर शंभर टक्के बंदी केली होती. नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे असा आग्रह सरकारचा आहे. बंदी नंतर राज्यात 290 टन प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टिक बंदीबाबत भारतात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याबद्दल युनो आणि इंग्लंड देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती