मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

सोमवार, 3 डिसेंबर 2018 (17:31 IST)
मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ५० टक्क्यावर आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. यासाठी राज्य सरकारने विधनेक काढले आणि अधिसूचना देखील काढली. मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले असले तरी याविरोधात सदावर्ते यांच्याकडून कोर्टात धाव घेण्यात आली आहे.
 
ज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून कोर्टाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती