मास्क न लावणाऱ्या लोकांचा फोटो घेऊन पोलीस स्टेशनला कळवणार

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (23:01 IST)
लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत लॉक डाऊन करण्याची वेळ येईल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तर मास्क लावण्याचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी बुधवारी रेल्वेने प्रवास केला. तसेच यापुढे मास्क न लावणाऱ्या लोकांचा फोटो घेऊन ते संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला.
 
मुंबईत कोरोनाचा प्रसार  प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यामुळे मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे प्रवासात नागरिक मास्क लावत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापौरांनी बुधवारी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रूझ स्टेशनपर्यंत धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करीत स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती