बारावीच्या दोषपूर्ण निकालामुळे मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर व तत्सम शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना जेईई, जेईई ॲडव्हान्स यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय वरच्या श्रेणीचे गुण मिळाले असताना बारावीत महत्वाच्या विषयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, औषध निर्माण, आर्किटेक्चर या करीअरपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची संधी हुकण्याची भीती पालकांनी धनंजय मुंडे , मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांची भेट घेऊन व्यक्त केली.