कॉंग्रेस महिला नेत्या हत्या तर एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्षाला अटक

कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या काही दिवसांपूर्वीच रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने राजकीय खळबळ उडाली, हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक, शहराध्यक्ष तौफिक शेख यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 
 
कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूरातून तौफिक शेखला पकडले असून, शेखला  विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख करण्यात आला आहे.  रेश्मा पडेकनूर यांची हत्या झाल्यापासून तौफिक शेख  फरार झाला होता. एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेखच्या विरोधात सोलापूरातील बाजार पोलीस स्टेशनमध्ये 17 मे रोजी विनयभंगाची तक्रार केली होती. ही  तक्रार दिल्यानंतर रेश्मा गायब होत्या. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे त्यांचा मृतदेह सापडला होता. 
 
रेश्मा यांच्या हत्येनंतर तौफिक शेख हा फरार झाला होता. हत्येमागे तौफिक शेखचा हात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रेश्मा यांनी सुद्धा तौफिक विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.  शेखला विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती