मोठी खळबळ जनक घटना समोर आली असून, शिक्षण संस्थेच्या संचालकाने स्वतःच्या पत्नीचे अभियांत्रिकीचे पेपर स्वतःच्या कॉलेजमधील प्राध्यापकाकडून सोडवून घेतले आहेत. पुण्यातल्या झिल एज्युकेशन सोसायटीच्या संचालकाने हे कृत्य केले आहे. यासंबंधीत प्राध्यापकानेच विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यावर विद्यापीठाने तात्काळ चौकशी समितीही नेमली खरी पण आता तक्रारदार प्राध्यापकानेच असं काही घडलंच नसल्याचं पत्रिज्ञापत्र विद्यापीठाला सादर केलं आहे. त्यामुळे सभ्रम वाढला आहे. आधी तक्रार नंतर मागे घेतली असे का केलेअसा प्रश्न विचारला जातो आहे. झिल एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयेश काटकर यांची पत्नी स्नेहल सुरेश जगताप हिचे एमईच्या पहिल्या वर्षाचे पेपर्स प्राध्यापक जैन यांच्याकडून लिहून घेतल्याची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. पण आता तक्रार करणाऱ्या प्राध्यापकाने त्याची तक्रार मागे घेत असं काही झालंच नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे आता विद्यापीठ नेमकी काय भूमिका घेत हे पाहावे लागणार आहे.