पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे. पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झाले असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
शेकाप महाआघाडीचा महापौर बसेल की, ठाकूर समर्थक भाजपच्या हाती महापालिका जाते, याचे चित्र दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्पष्ट होईल. भिवंडीत पाच केंद्रांवर मतमोजणी होईल. निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: एकूण – 78
– भाजप 50 जागांवर विजयी
– शेकाप 24 जागांवर विजयी
– राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी
– काँग्रेस 2 जागांवार विजयी
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 51 तर शेकापची 25 जागांवर आघाडी…भाजपला स्पष्ट बहुमत….नव्या महापालिकेचा शुभारंभ भाजपच्या सत्तेने….
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: खारघर, खांडा कॉलनीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शेकापने केलाय…हा निकाल पनवेलसाठी धक्कादायक…
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये सत्ता कुणाची येणार हे जवळपास स्पष्ट झालंय….भाजप 34 जागांवर आघाडीवर…तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर…भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाला सुरूवात…
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये सत्ता कुणाची येणार हे जवळपास स्पष्ट झालंय….भाजप 34 जागांवर आघाडीवर…तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर…भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाला सुरूवात…
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 34 जागांवर आघाडीवर सत्तेकडे वाटचाल…. शेकापला 15 आणि शिवसेना अवघ्या 1 जागेवर आघाडीवर
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 34 जागांवर आघाडी, शेकापला 15 आणि शिवसेना अवघ्या 1 जागेवर आघाडीवर
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 18 मधून शेकापचे चारही उमेदवार विजयी…..
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची जोरदार मुसंडी, आघाडी असलेल्या 30 पैकी 23 जागांवर विजय
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपचे उमेदवार विजयी…..
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: 30 पैकी 20 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी….शेकाप 15 जागांवर आघाडीवर तर सेना 1 जागेवर आघाडीवर…
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: 30 पैकी 22 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी….शेकाप पिछाडीवर…
राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा प्रभाग क्रमांक 17 मधून पराभव
पनवेल महापालिका निवडणूक निकाल:
कळंबोली प्रभाग क्रमांक 7 – भाजपाचा 4 जागांवर विजय
अमर पाटील
विद्या गायकवाड
प्रमिला पाटील
राजेंद्रकुमार शमा
प्रभाग क्रमांक 4 – भाजपाचे सर्व उमेदवार विजयी
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलचे माजी नगराध्यक्ष शेकापचे संदीप पाटील पराभूत
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: बालेकिल्ल्यात शेकापला मोठा धक्का, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत लढूनही शेकाप पिछाडीवर…भाजपने दिला मोठा झटका…भाजपची मोठ्या यशाकडे आगेकूच…
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप या महाआघाडीची चांगली सुरूवात…शेकापने दोन जागांवर घेतली आघाडी तर भाजप 1 जागेवर आघाडीवर….